Breaking News

शास्त्री नगर , सहकार नगर व लोकमान्य नगर विकासासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचे मोठे विधान

शास्त्री नगर , सहकार नगर व लोकमान्य नगर विकासासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचे मोठे विधान

शास्त्री नगर , सहकार नगर आणि लोकमान्य नगर परिसरातील विकासकामांबाबत सुरु असलेल्या चर्चांना आज मा ज्येष्ठ नगरसेवक मा. हनुमंत जगदाळे यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देत नागरिकांची संभ्रमातून मुक्तता केली.

जगदाळे म्हणाले, “नागरिकांनी कुठल्याही अफवा किंवा संभ्रमाला बळी न पडता आपल्या हक्काच्या घरासाठी ठामपणे उभे राहावे. काही मंडळी जाणूनबुजून विकास प्रक्रियेबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सत्य परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.”

ते पुढे म्हणाले,
“एक जनप्रतिनिधी म्हणून मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की— शास्त्री नगर, सहकार नगर व लोकमान्य नगर येथील कोणतेही घर सर्व कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करु, ठा. म. पा. कडून नकाशे मंजूर केल्या शिवाय व ठा. म. पा. मधून काम चालू करण्याची परवानगी दिल्या शिवाय ( CC ) कोणत्याही नागरिकांचे घर खाली केले जाणारं नाही अशी ग्वाही देतो.

प्रत्येक नागरिकाला समूह विकास योजनेच्या माध्यमातून मालकी हक्काचे घर मिळावे ही भावना महाराष्ट्र शासन तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ राव जी शिंदे साहेब यांची पहिल्या पासूनच आहे व त्यांना आमचे नेहमी सहकार्य आहे परंतु योजना राबवत असताना नागरिकांना मालकी हक्काचे घर मिळण्या बरोबरच कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी सहकार्य असणे गरजेचे आहे व ते नागरिकांनी करावे तरचं आपल्या विभागाचा विकास होण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागू शकतो”

परिसरातील रहिवासीही स्वतःच्या भागातील विकासाबाबत सकारात्मक असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विकासकामांना लवकरच सुरुवात होईल, असा त्यांना विश्वास आहे.

जगदाळे यांच्या ठाम विधानामुळे नागरिकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, हक्काचे तसेच अधिकृत घर मिळण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट आणि सुकर होणार असल्याची भावना रहिवाशांमध्ये व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button